PM Vishwakarma Yojana Benefits in Marathi : सध्या देशातील लोक भारत साकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना लाभ देण्यात येतो. या योजनेॅतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण आणी अर्थीक लाभही देण्यात येतो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कोणकोणते फायदे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नसल्यास, त्याबद्दल जाणून घ्या… (Learn about PM Vishwakarma Yojana 2024 benefits, including loan, skill training, ₹15,000 tool kit assistance, and eligibility for 18 traditional businesses across India).
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून किती रुपयांचे कर्ज मिळते?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रथम 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर 2 लाख रुपयांचे अतिरिक्त कर्ज देण्याचीही तरतूद आहे. आणी विशेष म्हणजे या कर्जासाठी लाभार्थ्याकडून कोणतीही हमी घेतली जात नाही आणि हे कर्ज अगदी कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते.
कर्जासोबतच विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना हे लाभ देखील मिळतात
पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाशिवाय इतरही अनेक फायदे मिळतात. यातील पहिला फायदा म्हणजे या योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना काही दिवस व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. यासाठी, प्रशिक्षण सुरू असे पर्यंत त्यांना दररोज 500 रुपये स्टायपेंड दिले जाते. याशिवाय लाभार्थ्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये दिले जातात.
कुणाला मिळतो पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ?
खालील लोक पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- सोनारकाम करणारे
- मासेमारीचे जाळे बनवणारे
- टोपली/चटई/झाडू बनवणारे
- लोहारकाम करणारे
- गवंडीकाम करणारे
- चांबारकाम करणारे
- शिंपीकाम करणारे
- बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
- धोबीकाम करणारे
- शिल्पकार