या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मीळेल 36,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कोणाला मिळतो लाभ Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana

2 Min Read
Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana 36000 Pension Scheme

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana : केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय फायदेशीर आहे. भविष्यात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा मिळावी यासाठी लोक खूप आर्थिक नियोजन करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा ५५ ते २०० रुपये गुंतवून मोठी पेन्शन मिळवू शकता. (Get ₹36,000 annual pension under Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana. Know eligibility, required documents, and registration process for unorganised sector workers).

या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या वारसदारास 50 टक्के पेन्शन मिळते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा कोण लाभ घेऊ शकतात?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असणारी एक योजना आहे.  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे. ही योजना रिक्षाचालक, भोजन कामगार, बांधकाम कामगार, शेती कामगार, वीटभट्टी कामगार, घरगुती कामगार, अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न रु 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे लागते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि बँक खात्याची झेरॉक्स घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे नोंदणी करू शकता. या योजनेसाठी बायोमेट्रिक्सद्वारे थेट नोंदणी केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. 

या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा

तुम्ही कामगार सुविधा केंद्राला भेट देऊन कामगार योजनेची माहिती मिळवू शकता. योजनेसाठी टोल फ्री क्रमांक १८००२६७६८८८ कार्यरत आहे. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळवू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article