Ration Card News Maharashtra : आता फक्त ‘या’ एका कागदपत्रावर मिळणार रेशन कार्ड

3 Min Read
Ration Card News Maharashtra Single Document Process 2024

Ration Card Latest News in Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता रेशन कार्ड काढणे आणखी सोपे होणार आहे. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील नागरिकांकडे आजही रेशन कार्ड नाहीय. शासनाच्या या निर्णयामुळे आता त्यांना रेशन कार्ड काढणे सहज शक्य होईल.

महाराष्ट्रातील विमुक्त जमाती मधील अनेक नागरिकांकडे आजही रेशन कार्ड नाहीय. या जमाती मधील गरीब लोक गावोगावी भटकंती करतात त्यांच्याकडे ना हक्काचा निवारा आहे ना पैसे कामावण्याचा स्रोत. पोटापाण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी भटकत राहिल्याने त्यांच्याकडे रहिवासाचा व इतर कोणताच पुरावा उपलब्ध नसतो त्यामुळेच ते रेशन कार्ड देखील काढू शकत नाहीत. सरकारच्या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची सर्वाधिक गरज या लोकांना असूनही त्यांना ते मिळू शकत नाही. पण ज्यांना गरज नाहीय अशा काही लोकांना त्याचा लाभ मिळतोय आणी ते लोक सरकारकडून दर महिन्याला मिळणारे अन्नधान्य दुकानदारांना विकून पैसे घेत आहेत.

🔴 रेशन कार्ड संदर्भातील आजची ताजी बातमी येथे वाचा 👉 Ration Card ekyc Maharashtra: ‘या’ तारखेपूर्वी रेशन कार्डचे ई-केवायसी करा, नाहीतर रेशन मिळणे होईल बंद.

पण आता मात्र या प्रवर्गातील नागरिकांना फक्त एका कागदपत्राच्या आधारावर रेशन कार्ड मंजूर करून दिले जाणार आहे. यामुळे भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड मिळण्याचा मार्ग आता सोपा झाल्याचे दिसत आहे.

भटक्या विमुक्त जमाती मधील नागरिकांकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नाही. त्यांच्या जन्माची आणि रहिवासी नोंदही नाही. यामुळे त्यांना रेशन कार्ड वर मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. तसेच ते शासनाच्या ईतर कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण आता या भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना रेशन कार्ड सहज मिळू शकणार आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

🔴 हे वाचलं का? 👉 Ration Card Online Aadhar Link Maharashtra: घरबसल्या असं करा रेशन कार्डला आधार लिंक.

मतदार ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेले राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटके विमुक्त जमातीचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी संदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवाशांचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट यासाठी आता ग्राह्य धरले जाणार आहे.

याबाबतचा शासन आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे. 28 जूनला हा आदेश निर्गमित झाला आहे. यामुळे आता भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 Ration Card Download Maharashtra : महाराष्ट्राचे रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे?, मोबाईलवरून 2 मिनिटात रेशन कार्ड डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article