200 Rs Note News in Marathi : अलीकडेच रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांची नोट काढली आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटाही काढण्याची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील 6 महिन्यांत रिझर्व्ह बँकेने 137 कोटी रुपयांच्या 200 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेतल्या आहेत. त्यामुळेच रिझव्र्ह बँक असे का करत आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. रिझव्र्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. (RBI withdraws ₹200 notes due to poor condition, not demonetization. Over ₹137 crore in ₹200 notes removed in 6 months to maintain quality in circulation. Learn more here).
याबाबत रिझर्व्ह बँकेने काय सांगितले?
वास्तविक, रिझर्व्ह बँकेने बाजारातून 200 रुपयांच्या नोटा परत घेण्याचे कारण म्हणजे या नोटांची खराब स्थिती. रिझर्व्ह बँकेने आपल्या सहामाही अहवालात असे म्हटले आहे की, 200 रुपयांच्या नोटांची स्थिती सर्वात वाईट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी करावी लागली. काही नोटा खराब झाल्या होत्या तर काही नोटांवर लिहिल्यामुळे अशा नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या आहेत. मागील वर्षीही रिझर्व्ह बँकेने 135 कोटी रुपयांच्या 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तेव्हाही रिझर्व्ह बँकेकडून हेच कारण सांगितले गेले होते.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या 633 कोटी रुपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या होत्या. या नोटा खराब झाल्यामुळे किंवा फाटल्या गेल्यामुळे परत घेण्यात आल्या. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 500 रुपयांच्या नोटांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी कमी आहे, तर 200 रुपयांच्या नोटांची संख्या 110 टक्क्यांनी वाढली आहे.
रिझर्व्ह बँकेने उचललेल्या या पावलाचा मुख्य उद्देश हा आहे की, बाजारात नोटांची गुणवत्ता टिकून राहावी. खराब नोटा मागे घेतल्याने लोकांना चांगल्या आणि स्वच्छ नोटा वापरण्यास मिळतील.