Sarkari Yojana News Today: केंद्र आणि राज्य सरकाद्वारे विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गावापासून लांब शहराच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी अनेक योजना सुरु आहेत. यात वसतिगृहासह विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आहेत. या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना नसल्यामुळे सरकारी योजनांचा लाभ न घेता विद्यार्थ्यांना स्वतः शिक्षणाचा सर्व खर्च करावा लागतो. या विद्यार्थ्यांसाठी च्या योजनेमुळे मोठ्या शहरातील नामवंत महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा. (Government scheme for students in maharashtra).
Sarkari Yojana For Students 2024 : Bharatratna Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक शैक्षणिक योजना आहे. अकरावी, बारावी आणि व्यावसायिक, व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेल्या, पण कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पात्रता आणी आवश्यक कागदपत्रे
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गांना घेता येतो.
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.
- पालकांचे उत्पन्न अडीज लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी स्थानिक नसावा. (म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःच्या घराजवळ असलेल्या संस्थेत प्रवेश घेतल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही).
- विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण शिक्षण घेणारा असावा. (दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या शैक्षणिक कोर्स साठी ही योजना लागू होत नाही).
- ११ वी व १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १० वीला कमीत-कमी ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- १२ वी नंतरच्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मंजूर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळतील असा विद्यार्थी ह्या योजनेस अपात्र ठरेल.
Nagpur News : सन २०२४-२५ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्हयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करुन अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.