असा करा अर्ज, मीळेल मोफत भांडी संच, कुणाला मिळणार लाभ? येथे जाणून घ्या सर्व माहिती Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024

2 Min Read
How To Apply Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024

Mofat Bhandi Yojana Maharashtra : बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबावल्या जात आहेत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत (Bandhkam Kamgar Bhandi Yojana) सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणी अद्याप तुम्हाला मोफत भांडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तो कसा मिळवायचा? बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Learn how to apply for the Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024, which provides free cookware sets to registered construction workers. Check eligibility and the application process).

अनेक बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल माहिती नसल्यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबावल्या जाणाऱ्या 32 योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना (Free Bhandi Yojana) खूपच फायदेशीर आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पण हे लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो.

अशी करा बांधकाम कामगार नोंदणी

  • 1: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/ वर जावा.
  • 2: ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा.
  • 3: तुमचा आधार कार्ड नंबर आणी मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.
  • 4: १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.

मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे.

🔴 हेही वाचा 👉 स्वतःची जागा नाही? खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपये अनुदान, कुणाला मिळणार लाभ? कोणती कागदपत्रे आवश्यक जाणून घ्या Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 Online Apply.

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो, जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलविले जाते आणी आधार बायोमेट्रिक केले जाते. आणी तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article