Mahadbt Farmer Id Registration : महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर, बियाणे, खते, ठिबक सिंचन, औजारे अशा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना ‘Farmer ID’ म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असतो. अनेक शेतकऱ्यांनी हा आयडी आधीच CSC किंवा महा ऑनलाईन सेंटरवरून घेतलेला असतो. पण अनेकदा अर्ज करताना तो लक्षात नसतो किंवा हरवतो – अशावेळी अर्ज अडून राहतो.
आता चिंता करू नका. घरबसल्या केवळ आधार नंबरवरून तुमचा फार्मर आयडी ऑनलाइन मिळवता येतो!
Farmer ID शोधण्याची प्रक्रिया – Step-by-step मार्गदर्शन
- महाडीबीटी शेतकरी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin) ला भेट द्या
- “वैयक्तिक शेतकरी” हा पर्याय निवडा
- “शेतकरी आयडी” टाकायचा बॉक्स दिसेल
- त्याखाली असणाऱ्या “शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा” – या लाल लिंकवर क्लिक करा
- नवीन विंडो उघडेल – तिथे तुमचा आधार नंबर टाका
- मोबाईलवर येणारा OTP टाका आणि ‘OTP तपासा’ वर क्लिक करा
- तुमचा Farmer ID स्क्रीनवर दिसेल – तो सेव्ह करून ठेवा
ही प्रक्रिया मोफत आहे आणि केवळ २ मिनिटांत पूर्ण करता येते.
नवीन शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यासाठी अर्ज कसा करायचा?
जर तुमच्याकडे अजून शेतकरी आयडी नसेल, तर:
Farmer ID मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा जवळच्या CSC / Mahaonline सेंटर वर जाऊन अर्ज सादर करू शकता.
Farmer ID मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
सातबारा उतारा
शेतकरी असल्याचा पुरावा (मालकी/किरकोळ शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र)
मोबाइल नंबर
Farmer ID साठी अर्ज करण्यासाठी साधारणतः 23.60 रुपये शुल्क आकारले जाते.
Farmer ID वापरून Mahadbt वर कोण कोणत्या योजना अर्जासाठी खुल्या आहेत?
जर तुमच्याकडे Farmer ID असेल तर, तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता:
ट्रॅक्टर अनुदान योजना
पॉवर टिलर
बैलचलित / मनुष्यचलित औजारे
बियाणे अनुदान
ठिबक सिंचन व तुषार सिंचन
फळबाग लागवड
रोपवाटिका अनुदान
पशुपालन योजना
POKRA योजना
यापैकी कोणत्या योजना सध्या सुरू आहेत याची माहिती मिळवण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in ला भेट द्या.