Aadhaar Lock In Marathi online : अचानक बँक खाते मोकळे होणे, बँकेतील पैसे परस्पर काढले जाणे यांसारखे प्रकार हल्ली खूप वाढले आहेत. त्यावर आधार लॉक करणे हा एक उत्तम पर्याय आहे. आधार लॉक केल्यावर तुमच्या बँक खात्यातील पैसे तुमच्याशिवाय ईतर कुणीही काढू शकणार नाही. असं केल्यानं तुमचे बँकेत तुमचे पैसे सुरक्षित राहतील. त्यासाठी आधार कसे लॉक करायचे ते जाणून घ्या.
आधार बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर करून कुणीही आपल्या परस्पर आपले बँक खाते रिकामे करू शकतो, अशा परिस्थितीत नागरिकांनी आपला बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. आधार-सक्षम पेमेंट सर्व्हिसेस (AEPS) किंवा बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी, नागरिक त्यांचा बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतात. असं केल्यानं कुणीही आपल्या बँकेतील पैसे काढू शकत नाही.
आधार बायोमेट्रिक्स लॉक करून, आधार कार्डधारक त्यांची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती सुरक्षित ठेवू शकतात. यामध्ये फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेशियल रेकग्निशन डेटाचा समावेश आहे. बायोमेट्रिक डेटा लॉक केल्याने त्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये कुणीही प्रवेश मिळवू शकत नाही.
तुमचा आधार बायोमेट्रिक डेटा असा करा लॉक :
1: सर्व प्रथम UIDAI वेबसाइट/mAadhaar ॲप वर जा. UIDAI ची अधिकृत वेबसाइट: myaadhaar.uidai.gov.in आहे.
2: UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar ॲपद्वारे तुमचा बायोमेट्रिक्स डेटा ऍक्सेस आणि लॉक करू शकता.
3: तुम्ही UIDAI वेबसाइटवरून किंवा ॲप वर जाणून तुमचा आधार क्रमांक टाकला की तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल, मिळालेला OTP वापरून तुमच्या आधार खात्यात लॉग इन करा.
4: त्यानंतर माय आधार विभागात गेल्यावर तुम्हाला लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सचा पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला पुन्हा तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणी एक OTP येईल तो ऑटोपी वापरून वेरिफिकेशन करा.
5: यानंतर, आधार लॉक करण्यासाठी ‘लॉक बायोमेट्रिक्स’वर क्लिक करा.
6: पुन्हा जेव्हा तुम्हाला आधार अनलॉक करायचे असेल तर येथेच येऊन अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा.
वर सांगितलेल्या सध्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक करून तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवू शकता.
🔴 हे वाचलं का? 👉 Aadhar Card Update Marathi Online: आधार कार्ड अपडेट करण्यापूर्वी हे जाणून घ्या, घरबसल्या ऑनलाइन अपडेट करा.