Mofat Bhandi Yojana Maharashtra : 2025 मध्ये महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबावल्या जात आहेत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत (Bandhkam Kamgar Bhandi Yojana) सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणी अद्याप तुम्हाला मोफत भांडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तो कसा मिळवायचा? बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Learn how to apply for the Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2025, which provides free cookware sets to registered construction workers. Check eligibility and the application process).
अनेक बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल माहिती नसल्यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबावल्या जाणाऱ्या 32 विविध बांधकाम कामगार योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना (Free Bhandi Yojana) खूपच फायदेशीर आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पण हे लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे. फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
अशी करा बांधकाम कामगार नोंदणी – Bandhkam Kamgar Yojana Registration
1: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/ वर जावा
2: ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा
3: तुमचा आधार कार्ड नंबर आणी मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा
4: १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.
मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2025 Online Apply : बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलवले जाते आणी त्यांचे आधार बायोमेट्रिक केले जाते. आणी जर तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो.