Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Applications Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजून अर्ज भरायचे राहिलेल्यांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी आता सुट्टीच्या दिवशीही शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. १३ आणि १४ जुलै रोजी सुट्टीचे दिवस असून देखील नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावर आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात मोठी बातमी:
लाभसाठी पात्र असणाऱ्या महिलांना योजनेचा पहिला हफ्ता लवकरात लवकरच देता यावा त्यासाठी सर्व महिलांचे अर्ज लवकरात लवकरच भरून व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशीही १३ जुलै आणि १४ जुलै रोजी सुरु राहणार आहेत.
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना योजनेचा पहिला हफ्ता ऑगस्ट महिन्यात 15 तारखेला दिला जाणार आहे. महिलांची अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी सुट्टीच्या दिवशीही अर्ज भरून घेतले जात आहेत.
🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेच्या निकषांत १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: अस तपासा यादीत तुमच नाव, जाणून घ्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार की नाही?.