Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करुन लाभार्थ्यांच्या तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करुन लाभार्थ्यांच्या तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. धुळे महापालिकेने आत्तापर्यंत तीन याद्यांतून सुमारे ७२३२ लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे. ईतर जिल्हा महापालिकांमध्ये सुद्धा अर्ज छाननीचे काम वेगाने सुरु असून लवकरच लाभार्थी महिलांच्या नावाच्या तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. (Learn what to do if your name is missing from the Ladki Bahin Yojana beneficiary list).
माझी लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महानगरपालिका तसेच पालिका आणी ग्रामपंचायत प्रशासन कार्यवाही करत आहे. त्यानुसार अर्जांची छाननी करुन दर शनिवार लाभार्थी महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जांची छाननी पूर्ण होताच शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व पात्र महिलांचे अर्ज शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
🔴 हे वाचलं का? 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? 2 मिनिटात तपासा.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव आले नाही तर हरकतींची नोंद करण्याची सुविधा
Find out how to register objections online and offline for Majhi Ladki Bahin Yojana scheme:
अर्जांवर प्राप्त अर्जदाराच्या हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे. आलेल्या अर्जांबाबत दर शनिवारी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्जांची छाननी होऊन शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत. जर एखाद्या पात्र महिलेचे यादीत नाव आले नाही तर त्याबाबत हरकत नोंद करता येणार आहे. आणी प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाचे पोर्टल सुरु झाल्यावर त्यावर देखील हरकतींची नोंद करता येऊ शकेल. सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी. “शासनाचे ऑनलाईन पोर्टल सुरु होताच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल”.
🔴 List Check 👉 लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव चेक करा.