Majhi Ladki Bahin Yojana : ‘या’ कागदपत्रात मिळाली मोठी सूट

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Document Relaxation

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : नवीनच लग्न झालेल्या नवविवाहित महिलांसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे खूपच अवघड होत असल्याने नवविवाहितांसाठी सरकारने आता एका कागदपत्रात सुट दिली आहे. त्याबद्दल अधिक जाणून घ्या…

Majhi Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारने नुकत्याच सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांचे अर्ज करून झाले आहेत तर काहींचे अजून बाकी असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. विशेषतः कागदपत्रांसाठी नवविवाहित महिलांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर उपाय काढत आता सरकारने नवविवाहितांना दिलासा दिला आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

नवविवाहितांना त्यांच्या कागदपत्रात अनेक बदल करून घ्यावे लागत असतात. काही नवविवाहितांची त्यांच्या माहेरातील रेशन कार्डवरून नावे कमी केलेली नसतात. तर काही नवविवाहितांची माहेराकडील रेशनकार्डवरून नवे काढलेली असतात, पण नवऱ्याकडील रेशनकार्डवर त्यांची नावे अद्याप लावलेली नसतात. त्यांच्याजवळ उत्पन्नाचा दाखला देखील नसतो. त्यामुळे अर्ज करताना त्यांची एका कागदपत्रांमुळे मोठी अडचण होत होती. राज्य सरकारने अशा नवविवाहितांना मोठा दिलासा दिला आहे.

🔴 महत्वाचे वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्र अस करा अपलोड.

पतीच्या रेशनकार्डवर नवविवाहित महिलेचे नाव लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

नारीशक्ती दूत अँपवरून असा भरा अर्ज

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनवर प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत हे अँप डाउनलोड करा
  • नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. अटी आणि शर्थी या बटणवर क्लिक करा आणी नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • मग चार अंकी ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो टाका आणि व्हेरीफाय ओटीपी या बटणावर क्लिक करा.
  • तुमचे प्रोफाईल भरा. म्हणजे तुमचे नाव, तुमचे गाव, जिल्हा आणि पत्ता. अशी सगळी विचारलेली माहिती भरा. नारीशक्ती या रकान्यात ‘सामान्य महिला’ हा पर्याय निवडा.
  • अर्ज भरून झाला की महिलांच्या योजना वर क्लिक करा. ‘माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा. 
  • तुमचा संपूर्ण अर्ज भरा. नाव, पतीचे नाव, जन्म तारीख, पत्ता अशी सगळी माहिती व्यवस्थित भरा. 

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यात आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तो नसेल तर रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक इत्यादी. नंतर फॉर्म सबमिट करा.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसै कधी मिळणार?

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर जमा केला जाणार आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article