Majhi Ladki Bahin Yojana : उत्पन्नाचा दाखला नाही, रेशन कार्ड पण नाही तरी मिळणार 1500; फडणवीसांनी सांगितले कसा मिळणार योजनेचा लाभ

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana No Income Certificate No Ration Card

Majhi Ladki Bahin Yojana News : महायुतीच्या शासकीय योजना अंमलबजावणी संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यादरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माझी लाडकी बहीण योजनेतील सगळ्या अटी-शर्थी काढून टाकल्या आहेत. आता आपल्याला रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखल्यासाठी गर्दी करायची काहीच गरज नाही. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड द्यावे, आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाही, त्यांनी काय करावे हे देखील फडणवीसांनी सांगितले…

विरोधक सावत्र भावासारखे आमच्या योजनेचा विरोध करतात 

विरोधक सावत्र भावासारखे आमच्या योजनेचा विरोध करतात आणि सख्खे भाऊ असल्याचा आव आणतात. पण आता त्यांचीच लोक गावागावात फॉर्म घेऊन फिरत आहेत. जस की स्वतःच्या खिशातून पैसे देणार आहेत असे ते वागत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची धावपळ सुरु आहे. या योजनेत असलेल्या त्रुटी सरकार दूर करत आहे. या योजनेसाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. मात्र, महिलांची तलाठी आणि सेतू कार्यालयात होणारी गर्दी पाहून सरकारने महिलांना दाखल्याऐवजी पर्याय म्हणून पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देण्यास सांगितले होते. पण ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आणि रेशन कार्ड सुद्धा नाही, अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा मिळेल असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर देवेंद्र फडणवीसांनी मार्ग काढला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल फडणवीसांचे मार्गदर्शन

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही या योजनेतील सगळ्या अटी-शर्थी काढून ही योजना सुलभ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा हाच आमचा उद्देश आहे. महिलांनी रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काढण्याचा त्रास घेऊ नये. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड द्यावे. आणि जर रेशन कार्डही नसेल तर त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचे आहे. मग त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. ‘Mukhyamantri Mazi Ladki Bahin’ ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्यासाठी नसून आत घेण्यासाठी असल्याचेही फडणवीसांनी सांगितले आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या सूचना

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑफलाईन, आणि नारिशक्ती मोबाईल अँप्लिकेशन द्वारे फॉर्म भरले जात आहेत. तरी फॉर्म भरून जमा करत असताना आपल्या बँकेचा अकाउंट नंबर बरोबर लिहिला आहे की नाही ते एकदा स्वतः तपासा. बँकेचा अकाउंट नंबर भरताना चुक करू नका, नाहीतर पैसे खात्यात जमा होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितले.

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

लाडकी बहीण योजना सुलभ करण्याचे प्रयत्न

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू महिलेला कशी मदत मिळेल यावर आम्ही विचार करत असून वेळोवेळी योजनेत काही महत्वपूर्ण बदल करून योजनेला सुलभ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

.

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article