Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून द्या, प्रति फॉर्म 50 रुपये मिळवा

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Online Form 50 Rupees

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून देणाऱ्यांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद या योजनेतंर्गत करण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावी आणि सोपी बनवण्यासाठी राज्य शासनाकडून योजनेची व्याप्ती वाढवली आहे. त्यानुसार यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता लाडकी बहीण ची नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद या योजनेतंर्गत करण्यात आली आहे.

शासनाकडून करण्यात आलेला बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करणे सोपे व्हावे याबाबत या योजनेच्या अटींमध्ये आता नव्याने बदल करण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज भरण्याची सोय शासनाने करून दिलेली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या अशा वेगवेगळ्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी आपण अर्ज करू शकता. महिलांना याआधी अर्ज करताना त्यांचा लाईव्ह फोटो द्यावा लागत होता. पण नव्या निर्णयानुसार आता लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे अधिक सोपे व्हावे यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळेच महिलांना आता अर्ज भरताना स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.   

🔴 हेही वाचा 👉 आता इथपण भरता येणार माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज.

योजनेचा अर्ज करण्यासाठी काय करायचं?

योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाईन अर्ज करणे सोपे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यात आपले नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व माहिती भरावी लागेल. आणी त्यानंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाईटवर अपलोड करावा लागेल. बँक खाते नमूद करताना बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरताना ही सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करूनच भरावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article