या जिल्ह्यातून ८०० ज्येष्ठ तीर्थयात्र्यांची पहिली रेल्वे आयोध्येसाठी रवाना, Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

2 Min Read
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra First Train Ayodhya

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra Apply : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली होती. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा राज्यस्तरीय ई- शुभारंभ पार पडला. (Maharashtra’s first special train under the Mukhyamantri Teerth Darshan Yojana departs from Kolhapur with 800 senior citizens for Ayodhya. Know more about this scheme).

महाराष्ट्रातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा राज्यस्तरीय ई- शुभारंभ पार पडला. कोल्हापुरातून ८०० ज्येष्ठ तीर्थयात्री विशेष रेल्वेने अयोध्येला मार्गस्थ झाले.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे आयोध्येसाठी रवाना झाली आहे. प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून यात्रेकरूंना मिळाली. मुख्यमंतत्र्यांनी ई-संदेशाद्वारे या तीर्थयात्रेत सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची आता लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अमंलबजावणी सुरु होईल अशी माहिती दिली. आणी राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास आणी भोजन खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आयआरसीटीसी कडून चांगल्या गुणवत्तेचा मोफत चहा, नाष्टा, जेवण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now