Ayushman Bharat Yojana Free Treatment Eligibility Hospitals: आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत आरोग्य विमा उपलब्ध करून देते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. ही योजना २०१८ साली सुरू करण्यात आली होती, आणि या योजनेला (ABY) “प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” असेही म्हणतात. (Learn about Ayushman Bharat Yojana’s free treatment eligibility, registered hospitals list, and benefits for senior citizens. Discover how to apply and get your Ayushman card today!).
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व रुग्णालयांमध्ये मिळतो का मोफत उपचार?
अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, आयुष्मान कार्डद्वारे देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू शकतो का? तर याच उत्तर आहे “नाही.” आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फक्त योजना मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्येच मोफत उपचार करता येतो.
आयुष्मान भारत योजना मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी कुठे पाहायला मिळेल?
आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) नोंदणी केलेल्या रुग्णालयांची यादी आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुम्ही वेबसाइटवर जाऊन तुमच्या जवळच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांची माहिती मिळवू शकता.
७० वर्षांवरील सर्व नागरिक आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र
नुकत्याच भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना (सामाजिक किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता) आयुष्मान भारत योजनेचा (Ayushman Bharat Yojana) लाभ घेता येईल. हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता लाडक्या बहिणींना निवडावी लागणार एकच योजना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान.
आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या.
- तुमच्या पात्रतेची तपासणी करा.
- अर्ज भरून आयुष्मान कार्ड मिळवा.
🔴 हेही वाचा 👉 तीन दिवसांच्या दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त; सोन्याचा आजचा भाव 5 जानेवारी 2025.
🔴 हेही वाचा 👉 तीन दिवसांच्या दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त; सोन्याचा आजचा भाव 5 जानेवारी 2025.