Ladki Bahin Yojana 2100 : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार अस कुणीच म्हटल नाही – मंत्र्यांचे स्पष्ट वक्तव्य

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Minister Clarification 2025

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Minister Clarification 2025 : राज्यात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Majhi Ladki Bahin Yojana)  विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरली. सध्या या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. निवडणुकीच्या घोषणापत्रात महायुतीने पुन्हा सत्तेत आल्यास लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिलांना अद्यापही १५०० रुपयांचाच हप्ता मिळत आहे. यावर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही,’ असे मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट सांगितले असून, २१०० रुपयांबद्दलची चर्चा विरोधकांनी सुरु केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महिलांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याचे चित्र दिसत आहे. झिरवळ यांनी सांगितले की, महिलांना सध्या मिळणारे १५०० रुपयेच पुरेसे आहेत आणि त्या या रकमेतच पूर्ण समाधानी आहेत. त्यामुळे २१०० रुपये देण्याचा कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची ठरली होती. निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर देखील लाभार्थी महिलांच्या हप्त्यात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले की, निवडणूक जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो आणि त्यानुसारच पुढील निर्णय घेतले जातील.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपण्यापूर्वी जमा केला जाईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नसून, ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासोबतच नमो शेतकरी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाबाबतही स्पष्टता करण्यात आली आहे.

🔴 हेही वाचा 👉 एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now