Ladki Bahin Yojana April 1500 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक महिलांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. महायुती सरकारच्या विजयात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या योजनेतून जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंतच्या काळात 9 हप्त्यांद्वारे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 13,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार, ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12,000 रुपये मिळतात, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जातो. अशा लाभार्थी महिलांची संख्या 7 लाख 74 हजार 148 इतकी आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी 2 कोटी 47 लाखांवर पोहोचले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये लाभ देताना ही संख्या 2 कोटी 33 लाख होती. त्यामुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
महिलांना नियमितपणे आणि वेळेत आर्थिक लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक विशेष टीम बँकिंगशी संबंधित अडचणी, कागदपत्र तपासणी आणि आधार लिंकींगसंदर्भातील अडचणी सोडवण्यावर काम करत आहे.
🔴 हेही वाचा 👉 Mofat Sadi Yojana : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी.