Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना पात्र महिलांना आता मिळणार मोफत सिलिंडर

3 Min Read
सध्याची मोठी बातमी, आत्ताच वाचा...

Majhi Ladki Bahin Yojana latest News: राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता गॅस सिलिंडर मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. अशातच आता, राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आणी या योजनेच्या अंमलबजावणीची तयारीही सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आणी त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आता दर महिन्याला १५०० रुपये आणी त्याचबरोबर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

🔴 हे वाचलं का? 👉 फक्त यांनाच मिळणार मोफत रेशन, Ration Card List August 2024 Maharashtra.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा करण्यात आली होती. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करण्यासाठी ही योजना राबण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेच्या माध्यमातून पात्र लोकांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलिंडरची सरासरी किंमत ८३० रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रत्येक सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

पण केंद्र सरकारच्या या योजनेचा महाराष्ट्रात सरकारला लाभ मिळणार नसल्याने यासाठी राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसारखेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थ्यांनाही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article