Majhi Ladki Bahin Yojana First Installment Date : महाराष्ट्र सरकारकडून सूरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची अर्ज भरण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. अनेक महिलांचे अर्ज भरून झाले आहे. नुकतेच लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणात त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची तारीख सांगितली आहे.
अहमदनगर मधील पारनेर येथे नुकतीच अजित पवार यांची एक सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबद्दल माहिती दिली. यासोबतच त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी आणि किती मिळणार याबद्दल माहिती दिली.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, १ जुलैपासून आम्ही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. आम्ही अजून फॉर्म भरला नाही, तर पैसे कसे मिळतील? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. पण त्याची काळजी करु नका लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्य भरा. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच शासनाकडूनही फॉर्म भरून घेण्याचे काम चालू आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला ते काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, त्यामुळे थोड्या अडचणी येऊ शकतात. फक्त फॉर्म नीट-नेटका भरा बँक खात्याचा तपशील भरताना त्यात चुका करू नका.असे अजित पवार म्हणाले.
🔥 अजून अर्ज भरला नसेल तर हे वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.
ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर?
तुमच्या बँक खात्यात आम्ही दर महिन्याला १५०० रुपये जमा करणार आहोत. आत्ता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3000 रुपये आम्ही एकत्र जमा करणार आहोत. ज्या महिलांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे एकदम दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका. ज्या गरीब माय माऊली आहेत, त्यांच्या प्राथमिक गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली होती. सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून झाली असेल तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
🔴 तुम्हाला हे माहित असलंच पाहिजे 👉 Ladki Bahin Yojana Hamipatra : अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय?, हमीपत्र कस भराव ते जाणून घ्या.
पहिला हफ्ता येणार 3000 रुपये
19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला 3 हजार रुपये जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत. इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतच आहेत. महाराष्ट्रात ज्या गरीब महिला आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ही योजना सुरु केली आहे, अस अजित पवार म्हणाले. (Majhi ladki bahin yojana first payment date is 19 August 2024).
🔴 हे वाचलं का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana : 1500 रुपये जमा करा, मिळवा 35 लाख.