Mazi Ladki Bahin Yojana List 2024: (Ladki Bahin Yojana Beneficiary List) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. लाडकी बहीण योजना यादी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन ऑनलाइन तपासू शकता. लाडकी बहीण योजना यादी मध्ये तुमचं नाव कस तपासायचं जाणून घ्या. (How to check majhi ladki bahin yojana list online maharashtra 2024).
Mazi Ladki Bahin Yojana Yadi 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली असून ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व लाभार्थी महिला नारी शक्ती दूत ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे आली आहेत की नाही ते चेक करू शकतात. लाडकी बहीण योजना यादी मध्ये ज्या महिलांची नावे आली असतील त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइलच्या मदतीने लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही ते तपासून शकता. जर तुमचे नाव लाडकी बहीण योजना यादीत असेल तर तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळतील.
महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यात ही योजना मदत करेल. राज्य सरकारकडून देण्यात येणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवन्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. या यादीत ज्या महिलांची नावे असतील त्यांना योजनेंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही आत्ताही अर्ज करू शकता आणी योजनेचा लाभ घेऊ शकता.
माझी लाडकी बहीण योजन लाभार्थी यादी कशी तपासायची?
- 1: सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
- 2: होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादी हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- 3: आता पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यात विचारलेला सर्व तपशील भरा.
- 4: त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- 5: तुमच्यासमोर आत्ता पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी उघडेल.
🔴 ही बातमी वाचली का? 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.
Mazi ladli behna yojana list maharashtra in marathi
क्र. | जिल्ह्याचे नाव | क्र. | जिल्ह्याचे नाव |
---|---|---|---|
1 | अहमदनगर | 2 | अकोला |
3 | अमरावती | 4 | औरंगाबाद |
5 | बीड | 6 | भंडारा |
7 | बुलढाणा | 8 | चंद्रपूर |
9 | धुळे | 10 | गडचिरोली |
11 | गोंदिया | 12 | हिंगोली |
13 | जळगाव | 14 | जालना |
15 | कोल्हापूर | 16 | लातूर |
17 | मुंबई | 18 | मुंबई उपनगर |
19 | नागपूर | 20 | नांदेड |
21 | नंदुरबार | 22 | नाशिक |
23 | उस्मानाबाद | 24 | पालघर |
25 | परभणी | 26 | पुणे |
27 | रायगड | 28 | रत्नागिरी |
29 | सांगली | 30 | सातारा |
31 | सिंधुदुर्ग | 32 | सोलापूर |
33 | ठाणे | 34 | वर्धा |
35 | वाशीम | 36 | यवतमाळ |
अधिकृत वेबसाइट
https://ladakibahin.maharashtra.gov.in
माझी लाडकी बहीण योजना यादी मोबाईलवरून तपासा
महाराष्ट्रातील ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्यांना सरकारने जारी केलेल्या माझी लाडकी बहीण योजना यादीत त्यांची नावे तपासायचे आहे त्यांना नारी शक्ती दूत ॲप वापरून लाभार्थी यादी तपासावी लागेल.
नारी शक्ती दूत ॲप वापरून लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, नारी शक्ती ॲप वरून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव अगदी सहजपणे तपासू शकता.