Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे ऑनलाईन अर्ज ‘नारी शक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून घरबसल्या भरू शकतात. ज्या महिला ‘नारी शक्ती दूत’ ॲप वापरून योजने साठी अर्ज करण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी देखील अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी होण्याच्यादृष्टिने शासनाच्या वतीने काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योजनेचे अर्ज मोफत देण्याची सुविधा केली आहे. तसेच अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्र, आणी आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरता येणार आहेत.
अर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार असल्यामुळे महिलांनी अर्ज भरण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नयेत. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
🔴 हे वाचल का? 👉 Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेत महत्वपूर्ण बदल; नवा आदेश जारी.
महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची व्याप्ती वाढावी आणि योजनेच्या कामात सुटसुटीतपणा यावा, यासाठी शासन योजनेत नवीन शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी बदल करत आहे. योजनेत होणारा बदल सर्वाना माहित व्हावा यासाठी गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून, या समितीमार्फत दर शनिवारी चावडी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांची कोणतीही फरपट होऊ नये, त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी ‘नारी शक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारे महिलांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज भरता येतो. कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हेच सरकारचे धोरण आहे. महिलांनी अर्ज भरताना आधार कार्ड, बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती अचूक भरावी. जेणेकरून लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शासनाकडून योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळेल.
🔴 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.