अजूनही करू शकता मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज, अर्ज करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ Mukhyamantri Yojana Doot Apply Last Date Extended 2024

1 Min Read
Mukhyamantri Yojana Doot Apply Last Date Extended 2024

Mukhyamantri Yojana Doot Apply Last Date : महाराष्ट्रात शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती पोहोवण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ (Mukhyamantri Yojana Doot) उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तुम्ही जर योजनादूत भर्ती साठी अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. योजनादूत भर्ती साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही अजूनही अर्ज केला नसल्यास आत्तासुद्धा अर्ज करू शकता. (The last date to apply for Mukhyamantri Yojana Doot 2024 in Maharashtra has been extended till 30th September 2024. Learn how to apply and required documents for recruitment).

मुख्यमंत्री योजनादूत योजनेला तरुणांकडून मिळत असणारा प्रतिसाद पाहता शासनाकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनादूत साठी अर्ज करण्यासाठी आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाद देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योजनादूत साठी तुम्ही केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र इत्यादी कागदपत्रे नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article