PM Mudra Yojana 2025 : व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तेही कोणतीही हमी न देता

2 Min Read
PM Mudra Yojana Details 2025

PM Mudra Yojana Details 2025 : देशात स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देशाने काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सरकार छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा सध्या सुरु असलेल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अतिशय सुलभ अटींवर 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कोणताही बेरोजगार युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असेल आणि त्यासाठी त्याला भांडवलाची कमतरता भासत असेल, तर तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत सहज अटींवर कर्ज घेऊ शकतो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अटी समजून घेणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत कॉर्पोरेट कंपन्या किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित कर्ज मंजूर केले जात नाही. तसेच, या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज वितरित करते. शिशु, किशोर आणि तरुण या तीन विभागांमध्ये कर्ज दिले जाते. शिशु श्रेणीत 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर श्रेणीत 10 लाख रुपयांपर्यंत तर तरुण श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यामुळे, विविध क्षेत्रातील व्यावसायिक त्यांच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात.

मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्जदाराकडे व्यवसाय योजना, प्रकल्प अहवाल, मागील काही वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न, टॅक्स भरल्याची प्रत, आधार कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड, स्थायी व व्यावसायिक पत्त्याचा पुरावा आणि अन्य संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास प्रधानमंत्री मुद्रा योजनेतुन सहजपणे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

🔴 हेही वाचा 👉 एप्रिल महिन्याचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now