‘या’ योजनेद्वारे सरकार तीन कोटी महिलांना लखपती बनवणार Lakhpati Didi Yojana in Marathi

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Mahila Binavyaji Karj

Lakhpati Didi Yojana |  लखपती दीदी योजना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे 11 लाख लखपती दीदींचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी की, लखपती दीदी योजनेचे हे अभियान भगिनी आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या भक्कम करेल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम बनवेल. भारत सरकारने या योजनेद्वारे तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लखपती दीदी योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी महिलांसाठी विशेष प्रकारची कौशल्य प्रशिक्षण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने चालना देऊ इच्छित आहे. लखपती दीदी योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील.

18 ते 50 वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लखपती दीदी योजनेंतर्गत सरकार महिलांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे.

जर तुम्हालाही लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला बचत गटात सहभागी व्हावे लागेल. यानंतर जर तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे आणि व्यवसाय योजना तयार करावी लागेल.

लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला,
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now