Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment Date : महाराष्ट्र सरकारने या अधिवेशनात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजना सुरु होताच राज्यभरातील महिलांचा या योजनेला प्रचंड उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रोज लाखोंच्या संख्येने महिलांचे अर्ज येत आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana 1st Installment Date: महाराष्ट्र सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजना सुरु होताच महाराष्ट्रातील महिलांचा या योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रोज लाखोंच्या संख्येने महिला अर्ज करत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात सरकार दरमहा 1500 रुपये जमा करणार आहे. अर्ज भरून झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार? हा प्रश्न पडला आहे. (Mazi ladki bahin yojana 1st installment date?).
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3 हजार रुपये जमा होणार आहे. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. योजनेसाठी अर्ज केलेल्या राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात हे 3000 रुपये जमा होतील. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्हालाही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आजची पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा मागवण्यात आला असून इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे. आणी त्यानुसार अर्ज छाननी केली जात आहे.
🔴 हे वाचलं का? 👉 Ladki Bahin Yojana यशस्वी! 10 हजार रुपये किमतीचा भांडी सेट? कुणाला मिळणार लाभ? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणी आतापर्यंत फक्त जवळपास 1.5 कोटी अर्ज दाखल झाले आहेत. 31 ऑगस्ट ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पण ही तारीख पुढे वाढवली जाणार आहे. अर्ज करून झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे.
फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आलेल्यापैकी ज्या महिलांनी या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले असतील अशा महिलांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. अर्ज अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.