धुळ्याच्या महिलेन सांगितल सत्य, सरकारवरचे आरोप फेटाळले Majhi Ladki Bahin Yojana Refund Truth Dhule

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Refund Truth Dhule

Majhi Ladki Bahin Yojana Refund Truth Dhule: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) साडेसात हजार रुपये परत घेतल्याच्या बातम्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती. यावरून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली, परंतु आता धुळ्याच्या खैरनार या महिलेने खरे वास्तव उघड केले आहे. (Discover the truth behind the ₹7500 refund in Majhi Ladki Bahin Yojana. Dhule beneficiary clarifies the situation, denying government action. Learn the facts about this scheme update).

खैरनार यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने पैसे परत घेतले नाहीत, तर त्यांनी स्वतःच ती रक्कम सरकारकडे परत जमा केली आहे. अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे, स्वतःच्या आधार कार्डाऐवजी मुलाचे आधार कार्ड दिल्यामुळे, मुलाच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या पाच हफ्त्यांचे ७५०० रुपये जमा झाले होते. ही चूक लक्षात येताच त्यांनी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधला व सर्व पैसे सरकारला परत केले.

काय आहे सत्य?


खैरनार यांनी सांगितले, “माझा अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे माझ्या मुलाच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. ही गोष्ट लक्षात येताच आम्ही त्वरित बालविकास विभागाला कळवले. कलेक्टर कार्यालयामार्फत आम्ही अर्ज रद्द केला आणि नव्या कागदपत्रांसह अर्जात सुधारणा केली. आता मला लाडकी बहीण योजनेचे हफ्ते वेळेवर मिळत आहेत. सरकारचे आभार! अस खैरनार म्हणाल्या.

सरकारवरचे आरोप फेटाळले


खैरनार यांचा मुलगा म्हणाला, “चुकीच्या पद्धतीने पैसे घेणे नैतिक नव्हते. त्यामुळे आम्ही स्वतःहून सरकारला पैसे परत केले. जुना अर्ज क्रमांक बंद करून नव्या कागदपत्रांसह पुन्हा अर्ज केला असून आता सर्व काही सुरळीत सुरू आहे.”

सरकारची भूमिका


राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी आलेल्या सर्व तक्रारींची तातडीने दखल घेतली जाणार आहे. महिला व बालविकास विभागानेही अशा प्रकरणांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासन कठोर पावले उचलत आहे. अर्ज करताना योग्य कागदपत्रांची पूर्तता करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनाच आर्थिक मदत दिली जाणार आहे. खैरनार कुटुंबाने केलेली सत्यता व पारदर्शकता ही इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कागदपत्रांचा वापर करू नका. तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला आर्थिक व कायदेशीर त्रास होऊ शकतो.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now