या एका चुकीमुळे यादीत नाव असूनपण मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे, Majhi Ladki Bahin Yojana Aadhar Card Link Bank Account

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Aadhar Card Link Bank Account

Majhi Ladki Bahin Yojana Aadhaar Card Details: माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुमचे पैसे बँक खात्यात जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…

Mazi Ladki Bahin Yojana Aadhaar Card Update: महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. काल 14 ऑगस्ट 2024 पासून सरकारने महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे मिळून 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.

अर्ज केलेल्यापैकी अनेक अर्जदार महिलांची नावे लाडकी बहीण योजना पात्रता यादीत आलेली नाहीत. त्यांच्या अर्जाची छाननी अजून सुरु आहे. सध्या फक्त लाडकी बहीण योजना पात्रता यादीत नावे आलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. पण जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लाडकी बहीण योजना यादी (Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List) मध्ये नाव येऊन पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करून घ्या.

Majhi Ladki Bahin Yojana Aadhar Link Bank Account

  • माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यातच दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतील.

लाडकी बहीण योजनेची लाभाची रक्कम थेट DBT द्वारे अर्जात नमूद केलेल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे महिलांची बँक खाती आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासोबत बँक खात्याचे ई-केवायसी देखील आवश्यक आहे. जवळच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी करता येते. पण, बँक खाते आधार लिंक करण्याची प्रक्रिया संबंधित बँकेला भेट देऊन करावी लागते.

  • तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास तुमच्या बँकेला भेट द्या आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article