Majhi Ladki Bahin Yojana Aadhar Link Bank Account: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे अनिवार्य आहे. ते तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा तपासू शकता त्याच बरोबर घरबसल्या ऑनलाईन ही चेक करू शकता. तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते कसे चेक करायचे ते जाणून घ्या…. (How to check aadhaar bank link status online).
आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, कारण जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे अडकू शकतात. सिमकार्ड मिळवण्यापासून ते निमसरकारी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंतच्या विविध कामांसाठी आधार कार्डची गरज असते. वास्तविक, आधार कार्ड भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीद्वारे जारी केले जाते. जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता, तेव्हा तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक असते. पण तुमचे आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे आणि कोणत्या खात्याशी नाही हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे सहज चेक करू शकता. बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही या प्रकारे तपासू शकता
आधार बँक लिंक स्थिती ऑनलाइन कशी तपासायची?
- 1: सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावा.
- 2: त्यानंतर येथे तुमच्या भाषेवर क्लिक करा, जसे की हिंदी, इंग्रजी, मराठी इ.
- 3: नंतर ‘My Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
- 4: नंतर ‘Check Your Aadhaar and Bank Account Linking Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- 5: येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- 6: यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.
- 7: त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
- 8: आता तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक) ओटीपी येईल.
- 9: OTP टाका आणि लॉगिन वर क्लिक करा
- 10: आता तुमच्या स्क्रीन वर तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्यांशी लिंक आहे की नाही ते दिसेल.
वर दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते घरबसल्या तुमच्या फोनवरून चेक करू शकता.