Majhi Ladki Bahin Yojana News Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या 1 कोटींहून अधिक महिला अर्जदारांपैकी 15 ते 17 लाख महिला अर्जदारांच्या बँक खात्यात अजून 1 रुपया जमा झाला नाही. त्यामुळं आता त्यांचं काय होणार? त्यांना माझी लाडकी योजनेचा लाभ मिळणार की नाही? हे जाणून घेऊयात… (Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today, माझी लाडकी बहिन योजना आजच्या ताज्या बातम्या)
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात तांत्रिक पडताळणीसाठी 1 रूपया जमा केला होता. अनेक महिला खातेदारांच्या खात्यात 1 रूपया जमा झाला आहे. आता त्यांच्यासाठी लाडकी बहीन योजनेचे पैसे जमा होण्यास कोणतीच अडचण नाही. पण जवळपास 15 ते 17 लाख महिला अर्जदारांच्या बँक खात्यात अजून 1 रूपया पोहोचलाच नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव येउनपण आता खात्यात 3000 रुपये जमा होणार की नाही याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे.
शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणी मध्ये अनेक पात्र महिलांच्या खात्यात 1 रूपया अजून पोहोचला नाही. खात्यात 1 रुपया पोहोचला नसलेल्या महिलांची संख्या 15 ते 17 लाख इतकी आहे. सरकारकडून 1 रुपया सेंड करूनही अजून बँक खात्यात पोहोचला नाही याची अनेक कारणे असू शकता. जसं की अर्ज भरताना महिलेकडून अर्जात चुकीचा बँक तपशील भरणे. खाते क्रमांक/Ifsc चुकीचा भरणे, बँक खाते बऱ्याच काळापासून वापरात नसणे. ई…
तुमच्या खात्यात अजून 1 रूपया जमा झाला नसेल तर या 17 लाख अर्जात तुमचाही अर्ज असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यासाठी बँक खात्यात 1 रुपया जमा न झालेल्या अर्जदार महिलांचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत.
महिला व बाल कल्याण विभागाकडून अजून खात्यात 1 रूपया जमा न झालेल्या डेटामधील अर्जदार महिलांचे अर्ज पुन्हा तपासून त्यांचे वेरिफिकेशन करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळेच लवकरात लवकरच त्यांच्या अर्जातील त्रुटी शोधून त्यांच्या बँक खात्यात पुन्हा 1 रुपया पाठवून बँक खात्याचा तपशील बरोबर असल्याची खात्री केली जाईल.