PF Balance Check | पीएफ बॅलन्स चेक: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO द्वारे नोकरदारांची पीएफ खाती (Pf Account) उघडली जातात आणि नंतर त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापून दरमहा पीएफ खात्यात जमा केली जाते. पीएफ खात्यातील पैशावर चांगले व्याजही दिले जाते. तुम्हीही नोकरी करत असाल तर साहजिकच तुमचे पीएफ खाते असेल? पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पीएफ खात्याची एकूण शिल्लक किती आहे? जर नसेल तर तुम्ही ते कसे तपासू शकता ते येथे जाणून घ्या… (how to check pf account balance online?).
Contents
तुम्ही पीएफ खात्यातील शिल्लक 3 प्रकारे तपासू शकता
1: तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक किती आहे हे तुम्ही मेसेजद्वारे जाणून घेऊ शकता
- यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन EPFOHO UAN लिहून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर मेसेज करा.
- हा संदेश फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पाठवा.
- यानंतर लगेच तुम्हाला मेसेजद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक किती आहे याची माहिती मिळेल.
2: EPFO च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता
- EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग इन करा.
- लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला सदस्य आयडीचा पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला ज्या आयडीसाठी पासबुक पाहायचे आहे तो आयडी निवडा.
- त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि येथे तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत ते पाहू शकता.
3: 011-22901406 वर मिस कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFO क्रमांक 011-22901406 वर मिस कॉल करा.
- यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळेल.
अशा प्रकारे तुमची तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत ते तपासू शकता.