केंद्र सरकार आर्थिक मदत करण्यासाठी तुम्हाला 46715 रुपये देत आहे. असा मेसेज तुमच्या मोबाईलवरही आला असेल तर आधी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
Link claims to offer financial aid: तुमची आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार तुम्हाला 46715 रुपये देत आहे. असा मेसेज तुमच्या मोबाईलवरही आला असेल तर सावधान. वास्तविक, लोकांची फसवणूक करून त्यांचे पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालयाच्या नावाने असे संदेश पाठवून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक केली जात आहे.
व्हॉट्सॲप वर असा संदेश पाठवून लोकांकडून फॉर्म मध्ये त्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जात होती. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस आले. याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर अर्थ मंत्रालयाने लोकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लोकांना फसवून वैयक्तिक माहिती गोळा केली जातेय
यासंदर्भात, केंद्र सरकारच्या वतीने, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने लोकांना सतर्क करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर हा संदेश व्हायरल होत आहे की सरकार गरजू लोकांच्या खात्यात 46715 रुपये जमा करत आहे. लोकांना त्यांच्या व्हॉट्सॲप वर मेसेज आणी फॉर्म पाठवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जात आहे.
असा मेसेज आल्यास मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती देऊ नका
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. ज्यात तुमचे नाव पत्ता आणी बँकेचे तपशील विचारले जातात, त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतात. या मेसेजद्वारे बँकेत 46715 रुपये जमा होण्याचे अमिश देऊन लोकांना फसवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा मेसेज कोठून आला आहे आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध दिल्ली पोलिसांकडून घेतला जात आहे. अशा कोणत्याही मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म मध्ये माहिती भरू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.