Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Time: लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या… (Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date and Time)
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पहिल्या व दुसऱ्या हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत. महिला आता तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता (Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment)
ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले असेल आणि ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल असेल त्याच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. अनेक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशा महिलांच्या बँक खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणी तिसऱ्या हफ्त्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार?
14 ऑगस्ट 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आला होता, मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान जमा केला जाणार होता. तरी अद्याप तिसरा हप्ता जमा झालेला नाही. पण आज ते येत्या दोन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील. अशी माहिती समोर आली आहे. पण अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.