Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 : महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी नव-नवीन कल्याणकारी योजना सुरु करून बांधकाम कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारी कार्य करत आहे. सध्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी कोण कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत ते जाणून घ्या…
Bandhkam Kamgar Yojana Mahiti : बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबावल्या जात आहेत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जात असलेल्या या योजनांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगार मंडळाद्वारे महाराष्ट्रातील 38 लाखांपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्यात येत आहे.
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | Bandhkam Kamgar Yojana List
- 1: बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे.
- 2: ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला असेल त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे.
- 3: बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहेत.
- 4: स्वतःचे हक्काचे घर नसलेल्या बांधकाम कामगारांना ‘अटल आवास योजना’ आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’द्वारे 4 लाखा रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
- 5: कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित मोफत शिक्षण देण्यात येत आहे.
- 6: बांधकाम कामगारांना सरकारकडून सुरक्षाकवच कार्ड दिले जात असून या कार्डद्वारे बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य, शिक्षण, घरकुल अशा एकूण 12 सेवा देण्यात येणार आहेत.
या सर्व योजना बांधकाम कामगारांसाठी खूपच फायदेशीर असून महाराष्ट्रातील प्रत्येक बांधकाम कामगारांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. (तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर या योजनांचा लाभ आवश्य घ्या, आणी तुमच्या ईतर बांधकाम कामगार मित्रांसोबत ही बातमी शेयर करायला विसरू नका).