उद्योगिनी योजनेतून काय लाभ मिळतो? कोणत्या महिला पात्र? अर्ज कसा करायचा येथे जाणून घ्या Udyogini Yojana Maharashtra 2024

2 Min Read
Udyogini Yojana Maharashtra 2024 Benefits Eligibility Application Process

Udyogini Yojana Scheme 2024 in Marathi : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांसाठी नव-नवीन फायदेशीर योजना सुरु केल्या जात आहेत. उद्योगिनी योजना ही केंद्र सरकारकडून महिलांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा महिलांना काय लाभ मिळतो? या योजनेसाठी काय पात्रता आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Learn about the Udyogini Yojana in Maharashtra 2024, its benefits for women entrepreneurs, eligibility criteria, and how to apply for a loan of up to Rs. 3 lakh to start your business).

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करता यावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. उद्योगिनी योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिल जात. या योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ होतो.

उद्योगिनी योजना पात्रता

  • अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे ते 55 वर्षादरम्यान असले पाहिजे.
  • अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्ता यांच्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. (यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जात).
  • इतर महिला ज्या बँकेकडून कर्ज घेतील त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर आकारला जातो.
  • * ज्या महिलांनी आधीच एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणी त्याची परतफेड केली नसेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक कागदपरत्रे

  • आधार कार्ड
  • जन्माचा दाखला
  • दोन पासपोर्ट साइज फोटो
  • रेशन कार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेकडून तुमची पात्रता तपासली जाईल आणी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल जाईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article