आत्तापर्यंत किती महिलांच्या खात्यात जमा झाला दिवाळी बोनस? येथे जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडक्या बहिणींच्या खात्यात 5500 रुपये दिवाळी बोनस जमा होत असल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत खरच किती लाडक्या बहिनींच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा झाले आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात… (Get the latest update on the Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024. Find out if eligible women are receiving the 5,500 INR bonus, and avoid false information about scheme benefits).

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : जुलै 2024 पासून महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाभ देण्यात आला आहे. 

दरम्यान, काही दिवासंपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. पण त्या बातमीमागे कोणतेही तथ्य न्हवते ती बातमी खोटी होती. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा होत असल्याची बातमी व्हायरल झाली आहे. या बातमीमागे काय तथ्य आहे ते जाणून घेऊयात…

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना तीन मोफत सिलिंडर देणारी अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे? येथे जाणून घ्या सर्व माहिती Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024.

महिला आणि बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसून. बोनसबाबतची बातमी खोटी आहे. सरकारकडून अशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खात्री करून घ्या. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक सुद्धा होऊ शकते.

🔴 हेही वाचा 👉 5500₹ कि 2500₹? तुमच्या खात्यात जमा झाला का दिवाळी बोनस?.

अदिती तटकरे : सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 मोफत भांडी संच मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

🔥 काही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता ठरणार शेवटचा हफ्ता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article