आता असे मिळतील मुलींना 1 लाख 1 हजार रुपये, लागतील फक्त ही कागदपत्रे Lek Ladki Yojana Maharashtra 2024

4 Min Read
Lek Ladki Yojana Maharashtra 2024

Maharashtra Lek Ladki Yojana : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असून सरकार अजूनही नवनवीन योजना आणि उपक्रम राबवण्यात व्यस्त आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सरकारने ही योजना यशस्वीरित्या राबवल्याचे दिसून येत आहे. (The Maharashtra government has launched the Lek Ladki Yojana for girls, providing financial assistance of Rs. 1,01,000 for education, birth, and support at the age of 18. Learn about eligibility, required documents, and more information).

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आणखी एक योजना सुरुवात केली आहे जिचे नाव आहे लेक लाडकी योजना, तसे पाहायला गेले तर या योजनेबाबत अजून जास्त लोकांना माहिती झालेली नाही. राज्य सरकारने मुलींसाठी सुरु केलेली लेक लाडकी योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात…

सरकारने का सुरु केली ‘लेक लाडकी योजना’?

आपला देश कितीही प्रगत झाला असला तरीही अजूनही मुलांच्या जन्माबाबत काहीसा भेदभाव दिसून येतो. तसेच मुलांचे शिक्षण व मुलींचे शिक्षण यात सुद्धा खूप फरक पाहायला मिळतो. महाराष्ट्र राज्याने यावर विचार करून ही लेक लाडकी योजना सुरू केली आहे. काही पैसे मुलगी जन्मानंतर, काही पैसे तिच्या शिक्षणासाठी व काही तिच्या लग्नाचा ही खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे यामुळे कुणालाही घरात मुलगी जन्मल्यानंतर आनंदच होईल.

राज्यातील सर्व मुलींना चांगले शिक्षण मिळावे व मुली सशक्त बनाव्यात यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. शिक्षणासाठी पुरेसा खर्च करू शकत नसल्यामुळे अनेक लोक आपल्या मुलींची लवकर लग्न करून देतात या सुद्धा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही ‘लेक लाडकी’ योजना सुरु केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 मोफत भांडी संच मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

कसे मिळणार पैसे व काय आहे योजनेचे स्वरूप ?

  • मुलीचा जन्म झाल्यावर                   5000 
  • मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर       4000 
  • ती सहावीमध्ये गेल्यानंतर                 6000 
  • अकरावीमघ्ये गेल्यानंतर                  8000 
  • मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर         75,000
  • एकूण रुपये                                 1,01,000

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना तीन मोफत सिलिंडर देणारी अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे? येथे जाणून घ्या सर्व माहिती.

 लेक लाडकी या योजनेसाठीची पात्रता

  • – मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • – लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असायला हवे.
  • – राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
  • – 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.
  • –  लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा फायदा मिळेल
  • –  दुसऱ्या अपत्याच्या प्रसुतीदरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा   फायदा मिळेल. मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • – लाभार्थीचा जन्म दाखला
  • – लाभार्थीचा रहिवासी दाखला 
  • – कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला
  • – लाभार्थीचे आधार कार्ड 
  • – पालकाचे आधार कार्ड
  • – बँक पासबुक
  • – पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • – दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असलेला दाखला
  • – कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • – शेवटचा हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे 

महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी या योजनेचा फायदा घेऊन जर एक लाख रुपयांची मदत मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला ही वरील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.

🔴 हेही वाचा 👉 Gold Price Today: धनत्रयोदशी आधीच सोने झाले स्वस्त, आज 28 ऑक्टोबर 2024 रोजीचा सोन्याचा भाव येथे तपासा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article