लाडक्या बहिणींना तीन मोफत सिलिंडर देणारी अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे? येथे जाणून घ्या सर्व माहिती Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024

2 Min Read
Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024 Details

Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली होती. ही योजना नेमकी काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Learn about Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024, offering three free LPG cylinders annually for eligible women under Ujjwala and My Dear Sister Schemes in Maharashtra).

CM Annapurna Yojana : विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना (Mukhyamantri Annapurna Yojana) जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी आणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळतो.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र कोण?

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत.
  • रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ मिळतो.

🔴 हेही वाचा 👉 …तर लाडकी बहीण योजना बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मिळत असल्याने यातील एखाद्या योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज केलेला असल्याने तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करावा लागत नाही.

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 3 मोफत सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येत आहे.
  • एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडर घेतल्यास अधिक सिलिंडरसाठी सबसिडी मिळत नाही.

🔴 हेही वाचा 👉 मोफत भांडी संच मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article