…तर लाडकी बहीण योजना बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Ajit Pawar Latest News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : लाडक्या बहिणींच्या खात्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत, त्यांना पैसे मिळतात तर तुमच्या का पोटात दुखत? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. (Plans to shut down the Majhi Ladki Bahin Yojana? Deputy Chief Minister Ajit Pawar criticises opposition efforts and emphasises the need for his government’s re-election to continue the scheme).

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Update : बारामती येथे आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर निशाणा साधला. राज्यात लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधक या योजनेस विरोध करत होते. विरोधकांकडून या योजनेबाबत समाजात गैरसमज निर्माण केला जात होता. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु करून महायुती सरकार महिलांची दिशाभूल करत असल्याची माहिती विरोधक पसरवत होते. त्यावरून अजित पवार यांनी सभेत विरोधकांची चांगलीच कानउघडणी केली.

राज्यात जुलै महिन्यात लाडकी बहीण या योजनेची घोषणा केल्यापासून विरोधक या योजनेला विरोध करत आहेत. बहिनींच्या खात्यात पैसे जमा होतात तर तुमच्या का पोटात दुखत? निवडणूक जाहीर होताच विरोधक काहीतर खोडा घालतील म्हणूनच आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे बहिनींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जर विरोधक सत्तेत आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या हालचाली होऊ शकतता, योजनेसाठी पुन्हा आपल सरकार सत्तेत आल पाहिजे अस अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभ करण ही माझी चुक होती. जो काम करतो त्याच्याकडून काही चुका देखील होऊ शकतात. मी मोठ्या मनान माझी चूक कबूल करतो अस अजित पवार म्हणाले. अस बोलताना अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू आल्याच पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या महिला कार्यकर्त्या सुद्धा चांगल्याच भावुक झाल्या. दादा आता रडायच नाही लढायच अशी घोषणाबाजी सभेसाठी उपस्थित महिलांनी केली.

🔴 हेही वाचा 👉 फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून ३०० रुपये, विरोध करणाऱ्यास जीवे मारण्याची धमकी.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article