Post Office FD मध्ये पत्नीच्या नावाने 1 लाखांची गुंतवणूक केल्यास 2 वर्षांत किती परतावा मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

2 Min Read
1 Lakh Rupees FD Interest In Post Office

1 Lakh Rupees FD Interest In Post Office : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बऱ्याच बँकांनी आपल्या ठेवीवरील व्याजदरात घट केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिसने आपल्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट (TD) स्कीममध्ये गुंतवणूक करणे अजूनही ग्राहकांसाठी फायद्याच ठरत आहे. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षासाठी 6.9 टक्के, 2 वर्षांसाठी 7.0 टक्के, 3 वर्षांसाठी 7.1 टक्के आणि 5 वर्षांसाठी 7.5 टक्के इतक आकर्षक व्याज दिल जात आहे.

पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच असून, गुंतवणुकीच्या ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर परतावा मिळतो. या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिक, वरिष्ठ नागरिक, पुरुष किंवा महिला सर्वांना एकसारखा व्याजदर लागू असतो. विशेष म्हणजे, वय किंवा इतर कोणत्याही आधारावर व्याजदरात बदल होत नाही.

जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या TD योजनेत दोन वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दोन वर्षांच्या कालावधीनंतर एकूण 1,14,888 रुपये परत मिळतात. या रकमेमध्ये मूळ गुंतवणूक रक्कम 1,00,000 रुपये आणि त्यावर मिळालेल 14,888 रुपयांच निश्चित व्याज यांचा समावेश आहे. यामुळे, पोस्ट ऑफिसची ही योजना सुरक्षित आणि स्थिर परताव्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला पर्याय मानला जात आहे.

पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजना केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालवल्या जात असल्यामुळे या योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित मानली जाते. त्यामुळे कमी जोखमीच्या गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट Post Office FD हा विश्वासार्ह पर्याय ठरतो.

(टीप: वरील माहिती फक्त माहितीच्या उद्देशाने दिली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now