या योजनेत गुंतवा दरमहा फक्त 210 रुपये, मीळेल दरमहा 5000 रुपये पेन्शन, Atal Pension Yojana Details

2 Min Read
Atal Pension Yojana Invest 210 Rs Monthly Get 5000 Rs Pension Details

Atal Pension Yojana in Marathi : सरकारद्वारे अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत त्याअंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. काही योजनांमधून आर्थिक लाभ दिला जातो तर काही योजनांद्वारे अनुदान किंवा इतर अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यातीलच एक भारत सरकारद्वारे राबवली जाणारी फायदेशीर योजना आहे जी ६० वर्षांनंतर पेन्शन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी चालवली जाते. जिचे नाव आहे ‘अटल पेन्शन योजना’. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर, ही योजना नेमकी काय आहे? यासाठीची पात्रता काय आहे? आणी तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा किती रुपये पेन्शन मिळू शकते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Atal Pension Yojana: Invest just ₹210 per month and secure a pension of ₹5000 per month after 60. Learn about eligibility, benefits, and how to apply for the APY scheme).

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रथम गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करू शकता आणि ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते.

  • अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठीची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे.

अटल पेन्शन योजना गुंतवणूक

जर तुमचे वय 18 वर्षे असेल तर तुम्हाला या योजनेत दरमहा फक्त 210 रुपये गुंतवावे लागतील. आणी 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळते. तुम्हाला या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय या योजनेत वेगवेगळे प्रीमियम भरून तुम्हाला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

  • जर तुम्हाला अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.
  • यानंतर तुमच्या बँक खात्यातून दरमहा तुम्ही निवडलेल्या रकमेचा हफ्ता कापला जाईल आणी तो या योजनेत गुंतवला जाईल.
  • त्यानंतर वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळणे सुरु होईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article