Ayushman Bharat Yojana Patrata in Marathi: जेव्हा तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही त्या विशिष्ठ योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला प्रथम जाणून घ्यावे लागते. प्रत्येक योजनेची पात्रता यादी असते आणि जर तुम्ही त्या अंतर्गत पात्र असाल तरच तुम्ही त्या योजनेत सामील होऊन लाभ घेऊ शकता. आयुष्मान भारत ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते आणि ही एक आरोग्य योजना आहे ज्या अंतर्गत सरकार तुम्हाला मोफत उपचाराचा लाभ देते. जर तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे असेल, तर प्रथम तुम्हाला यासाठीची पात्रता माहित असली पाहिजे. तुम्ही पात्र असाल तरच तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल आणी तुम्ही मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊयात आयुष्मान भारत योजनेसाठी कोण पात्र असेल त्याबद्दल… (Check Ayushman Bharat Yojana eligibility in Maharashtra. Find out if you qualify for the Ayushman card to receive free medical treatment up to Rs 5 lakh per year).
आयुष्मान भारत योजनेच्या पात्रता यादीबद्दल जाणून घेण्याआधी या योजनेच्या लाभार्थ्यांना काय लाभ मिळतात ते जाणून घेऊयात. वास्तविक, आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड बनवले जाते आणी या कार्डच्या मदतीने लाभार्थी मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतात. या कार्डची मर्यादा प्रतीवर्ष 5 लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच या कार्डचा वापर करून तुम्ही वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकता.
आयुष्मान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?
पात्रता |
---|
ग्रामीण भागातील लोक |
असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक |
अनुसूचित जाती जमातीचे लोक |
जे अपंग आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग आहे |
आदिवासी किंवा निराधार |
रोजंदारीवर काम करणारे लोक |
70 वर्षाहून अधिक वय असणारे सर्व लोक |
यानुसार जे पात्र आहेत त्यांनाच आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळू शकतो.