Ayushman Card Apply Maharashtra : आपल्या देशात अनेक प्रकारच्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सुरू आहेत. माझी लाडकी बहीण योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान योजना याशिवाय इतर अनेक योजनांचा यात समावेश आहे. त्यातीलच केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक फायदेशीर योजना आहे ती म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड बनवले जाते आणी या कार्डचा वापर करून कार्डधारक रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. जर तुम्हालाही तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल, तर तुम्हाला आधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्यावे लागेल. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आयुष्मान कार्ड साठी अर्ज करू शकता. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Learn how to apply for Ayushman Card in Maharashtra and check your eligibility. Get free healthcare up to Rs 5 lakh under Ayushman Bharat Yojana. Find step-by-step details here).
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड बनवू शकता आणि त्यानंतर वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता.
- 1: आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे लागेल.
- 2: त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमची पात्रता तपासली जाईल.
- 3: त्यानंतर तुमची कागदपत्रे पडताळली जातील. सर्वकाही बरोबर आढळल्यानंतर, तुमचा अर्ज भरून जमा करून घेतला जाईल.
- 4: काही काळानंतर तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल. त्यानंतर तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता.
तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवता येईल का?
तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून दरवर्षी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला यासाठी तुमची पात्रता तपासावी लागेल. आयुष्मान योजनेच्या पात्रता यादीनुसार हे लोक आयुष्मान योजनेसाठी पात्र आहेत.
- * असंघटित क्षेत्रात काम करणारे
- * रोजंदारी मजूर म्हणून काम करणारे
- * अनुसूचित जाती जमातीतील लोक
- * ग्रामीण भागात राहणारे लोक
- * अपंग व्यक्ती किंव, कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग असेल असे कुटुंब
- * आदिवासी, निराधार असणारे
- * वय वर्षे 70 व त्याहून अधिक वय असणारे