ॲपद्वारे आयुष्यमान कार्ड बनवण्यात येतेय अडचण? मग वापरा हा सोपा मार्ग, लवकरच बनेल तुमचे आयुष्यमान कार्ड Ayushman Card Registration 2024

2 Min Read
Ayushman Card Registration Guide

Ayushman Card Registration Guide : आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असावे लागते. मग त्या कार्ड मार्फत सूचीबद्ध रुग्णालयात जाऊन तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ घेऊ शकता. (Learn the easiest methods to register for your Ayushman Card under Ayushman Bharat Scheme. Get up to five lakh rupees in free medical treatment benefits. Check eligibility and process here!).

सध्या मोठ्या संख्येने लोक आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. परंतु काही लोकांना अजून आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे याचाच पत्ता नाही, तर आम्ही त्यांच्यासाठी दोन सोपे व सरळ मार्ग घेऊन आलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया काय आहे त्या पद्धती…

Ayushman Card Registration Maharashtra: सरकार सध्या गरजू व अल्प उत्पान्न असलेल्या लोकांसाठी नव-नवीन योजना, उपक्रम, राबवत आहे, सध्या माझी लाडकी बहीण व लेक लाडकी या योजना महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध झाल्या असून त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेलासुद्धा संपूर्ण देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हालाही वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या दोन मुख्य पद्धती असून एक ऑनलाईन ॲपद्वारे आयुष्यमान कार्ड बनवणे व दुसरे आपल्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म सबमिट करून कार्ड बनवणे इत्यादी.

जर तुम्हाला ॲपवरून ऑनलाईन आयुष्यमान कार्ड बनवण्यात समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जाऊन तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, तेथे तुमची कागदपत्रे तपासून तुमचा फॉर्म सबमिट करून घेतला जाईल. त्यानंतर तुमची माहिती अपलोड केली जाईल व तुमचे आयुष्यमान कार्ड बनवले जाईल.

आयुष्मान कार्ड साठीची पात्रता ?

  • जे लोक रोजंदारीवर काम करतात
  • जे अनुसूचित जाती जमातीचे आहेत
  • आदिवासी किंवा निराधार लोक
  • असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक
  • ग्रामीण भागात राहणारे लोक
  • कुटुंबातील एखादी व्यक्ती अपंग असेल असे कुटुंबीय
WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article