स्वतःची जागा नाही? खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपये अनुदान, कुणाला मिळणार लाभ? कोणती कागदपत्रे आवश्यक जाणून घ्या Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 Online Apply

3 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 Land Purchase Grant Apply

Bandhkam Kamgar Yojana 2024 Online Apply : बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांची मदत मिळत होती. पण आता कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जात आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणी तुम्हालाही स्वतःची जागा खरेदी करायची असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ अवश्य घेतला पाहिजे. नेमकी काय आहे ही योजना आणी या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याबद्दल सविस्तर माहित जाणून घेऊयात… (Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 offers a Rs 1 lakh grant to registered construction workers for land purchase. Learn eligibility, required documents, and how to apply online).

Bandhkam Kamgar Gharkul Yojana Apply Online: बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातीलच एक योजना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नसणाऱ्या बांधकाम कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये देते. पण फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच कामगार मंडळाकडून घरकुल योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.

म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊन स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल.

ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana) 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते.

याआधी जागा खरेदीसाठी बांधकाम कामगारांना 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते, पण अट ते वाढवून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आता एकूण 2 लाख 50 हजार रुपये मिळत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

बांधकाम कामगार नोंदणी करणे खुप सोपे आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी करू शकता आणी नोंदणी करताच या योजनेचा लाभ घेऊन स्वतःची जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • सरकारी कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का असणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र

अशी करा फक्त 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी:

  • 1: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/ वर जावा.
  • 2: ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा.
  • 3: तुमचा आधार कार्ड नंबर आणी मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.
  • 4: १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.

जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच तुम्ही अटल बांधकाम कामगार आवास योजना आणी बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या विविध ३२ सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article