Bank Holidays in August 2024 | ऑगस्ट 2024 मध्ये बँक सुट्ट्या: जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर आत्ताच जाणून घ्या येत्या काही दिवसांत बँकांना सुट्या कधी आहेत?
Bank Holidays in August 2024 : बँक सुट्ट्यांची यादी महिना सुरू होण्यापूर्वीच जारी केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्टीची यादी जाहीर केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसांतही अनेक दिवस बँका बंद होत्या. तर महिनाअखेरीसही अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर ते लगेच करून घ्या कारण बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत.
सलग तीन दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास ते लवकर पूर्ण करा. बँका कधी बंद राहणार आहेत?
देशभरातील बँका बंद राहतील
येत्या काही दिवसांत सलग ३ दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. 24 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. 25 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने आणि 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत बँकेला सलग सुट्टी असेल.