Average Minimum Balance of Banks in India 2024: तुमचे कोणत्याही बँकेत खाते असो त्या बँकेच्या बचत खात्यात (saving account) तुम्हाला काही कमीत कमी मर्यादित रक्कम शिल्लक ठेवावी लागते. खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक न ठेवता सर्व पैसे काढले आणी खात्यात 0 बॅलन्स ठेवला तर तसे केल्यास बँका दंड आकरतात. बँक बचत खात्यामध्ये नॉन-मेंटेनन्स चार्जेस टाळण्यासाठी ॲव्हरेज मिनिमम बॅलन्स (AMB) असणे गरजेचे आहे.
यासंदर्भात नुकतेच एक बातमी ऐकायला मिळाली की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल त्यांच्या खातेधारकांकडून सुमारे 8,495 कोटी इतके रुपये वसूल केले. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक (SBI) ही बँक मागील काही वर्षांपासून खात्यात किमान शिल्लक न ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. पण, इतर अनेक सरकारी बँका खात्यात शिल्लक न ठेवल्याबद्दल शुल्क आकारत आहेत. खात्यात ॲव्हरेज मिनिमम बॅलन्स शिल्लक न ठेवल्यास कोणती बँक किती रुपयांचा दंड आकारते ते जाणून घेऊयात… (minimum balance for savings account in india.)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- SBI 2020 पासून बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास कोणतेही शुल्क आकारत नाही.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
- ICICI बँकेची किमान शिल्लक 5000 रुपये आहे. Icici बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर ही बँक 100 रुपये + आवश्यक MAB मधील कमतरतेच्या 5% दंड आकारते.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
- एचडीएफसी बँकेत मेट्रो आणि शहरांच्या भागांसाठी सरासरी मासिक शिल्लक रुपये 10,000 आहे किंवा एक वर्ष आणि एका दिवसासाठी 1 लाख रुपयांची एफडी आहे. अर्धशहरींसाठी हा नियम 1 वर्ष 1 दिवसाच्या कालावधीसाठी 5,000 रुपये किंवा 50,000 रुपयांची एफडी आहे. ते कायम न ठेवल्यास, सरासरी शिल्लक कपातीच्या 6% किंवा 600 रुपये (जे कमी असेल) तेवढा दंड आकारला जातो.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
- Punjab National Bank खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास ही बँक ग्रामीण भागासाठी 400 रुपये, निमशहरीसाठी 500 रुपये आणि शहरी/मेट्रो भागांसाठी 600 रुपये दंड आहे.
येस बँक (YES BANK)
- येस बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास ही बँक कोणतेही शुल्क आकारत नाही.
ॲक्सिस बँक (AXIS BANK)
- ॲक्सिस बँक बेसिक बचत खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास कोणतेही शुल्क आकारत नाही. पण, ही बँक मेट्रो आणि शहरी भागात 600 ते 50 रुपये, सेबी अर्बनमध्ये 300 ते 50 रुपये आणि ग्रामीण भागात 150 ते 75 रुपये दंड आहे.