Cheque Bounce Rule In India | भारतात चेक बाऊन्स नियम : सध्या ऑनलाईन पेमेंटमुळे रोखीचे व्यवहार खूपच कमी झाले आहेत. एखाद्या मोठ्या रकमेचा व्यवहार करताना लोक ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देतात कारण पेमेंट करणे सोपे आहे आणी पैसे दिल्याचा पुरावा जवळ राहातो. ऑनलाइन पेमेंट सोबतच लोक पेमेंट करण्यासाठी चेक देखील वापरतात. तुम्ही देखील चेकद्वारे पेमेंट करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. कारण तुमचा चेक बाऊन्स झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे चेकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला भारतात चेक बाऊन्स संबधी कोणते नियम आहेत हे माहित असणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
भारतात चेक बाऊन्स संबधी नियम काय आहे?
जर तुम्ही एखाद्याला चेक दिला आणि तो काही कारणास्तव बाऊन्स झाला, तर तुमच्या बँक खात्यातून दंड आकारला जातो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला तुम्ही चेक दिला होता त्या व्यक्तीस एक महिन्याच्या आत तुम्हाला पेमेंट करावे लागते. तसे न केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.
जर चेक बाऊन्स झाला आणि काही कारणास्तव तुम्ही एका महिन्याच्या आत पेमेंट करू शकला नाही, तर तुमच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस जारी केली जाऊ शकते. तुम्हाला त्या नोटीसचे 16 दिवसांत उत्तर देने बंधनकारक असते. जर तुम्ही नोटीसला उत्तर दिले नाही तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
होऊ शकते शिक्षा
जर तुम्ही एखाद्याला चेक दिला आणि तो बाऊन्स झाला तरीही त्यानंतर तुम्ही त्याला एका महिन्यात पैसे न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
हे कायम लक्षात ठेवा
(चेकवर फक्त सही करून कोणालाही चेक देऊ नका, चेकवर पैसे, तारीख आणि इतर माहिती स्वतः भरा).