महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत तर मुख्यमंत्री हफ्ता वाढवण्याच्या तयारीत – CM Eknath Shinde On Majhi Ladki Bahin Yojana

2 Min Read
Cm Eknath Shinde Majhi Ladki Bahin Yojana Latest Update

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हत्याची प्रतीक्षा करत आहेत तर मुख्यमंत्री हफ्ता वाढवण्याचा तयारीत… (CM Eknath Shinde plans to increase the installment amount for Majhi Ladki Bahin Yojana. Learn more about the third installment status and upcoming updates for eligible women in Maharashtra).

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होत असून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता लवकरच जमा केला जाईल आणी या आठवड्याच्या अखेर पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होतील. अशातच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Mazi ladki Bahin 3rd Installment List Out : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होते आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्रालयाकडून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या नावाची यादी बँकेकडे पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे हफ्ते ज्या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यांच्याही बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे  लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2 कोटींच्या घरात जाईल.

1500 रुपये ही छोटी रक्कम 

“दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही आमच्या महिला भगिनींसाठी ही रक्कम छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली, लेक लाडकी योजना सूरु केली. केंद्र सरकारने लखपती दीदी, ड्रोन दीदी अशा योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील आमच्या भगिनींसाठी अजून कोणत्या नवीन कल्याणकारी योजना राबवता येतील याबद्दल आमची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेले मला पाहायचे आहे. लाडकी बहीण योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काही जणांचा या योजनेवर अजून संशय आहे. पण आम्ही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 रुपयांवरून 2000 रुपये किंवा त्याहून जास्त वाढवू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article