मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील गोपनीय माहिती उघड – CM Eknath Shinde Reveals Important Details About The Majhi Ladki Bahin Yojana

4 Min Read
Cm Eknath Shinde Majhi Ladki Bahin Yojana Secrets Revealed

Majhi Ladki Bahin Yojana Latest News: CM Eknath Shinde- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील गोपनीय माहिती स्पष्ट केली आहे. यादरम्यान त्यांनी ही योजना का बंद पडणार नाही, योजनेचा हफ्ता कधी वाढवला जाईल याबद्दलची महत्वपूर्ण माहिती स्पष्ट केली आहे. जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री… (CM Eknath Shinde reveals important details about the Majhi Ladki Bahin Yojana, clarifying its continuation, installment increase, and benefits for 2 crore women across Maharashtra).

Maharashtra News: महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन’ योजनेंतर्गत आता राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. लाडकी बहीन योजनेचे 2 हफ्ते देण्यात आले असून येत्या 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 3 रा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे. अजूनही ज्या भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी अर्ज करावा त्यांनाही लगेच सप्टेंबर महिन्याचा लाभ देण्यात येईल. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

Cm Eknath Shinde clarified the confidential information regarding Majhi Ladki Bahin Yojana: आमच्या सरकारने लाडकी बहिन योजनेची घोषणा करताच विरोधकांनी ही योजना फसवी असून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असा अपप्रचार सुरु केला. आता या योजनेच्या माध्यमातून दीड कोटिहून अधिक भगिनींना आमच्या सरकारने शब्द दिल्याप्रमाणे लाभ दिला आहे. राज्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही अर्ज भरण्यासाठीची मुदतही वाढवली.

अजूनही विरोधकांकडून या योजनेबद्दल समाजात गैरसमज पसरवला जात आहे. ‘निवडणुकीपुरते 2-3 हफ्ते देतील आणी पुढ ही योजना बंद करतील’ अशी खोटी माहिती पसरवण्याचे काम सुरु आहे. मध्य प्रदेशात सुरु असणाऱ्या ‘लाडली बहन योजने’पासून प्रेरित होऊन आम्ही ही योजना सुरु केली आहे. मध्य प्रदेशची लाडली बहन योजना मार्च 2023 पासून सुरु आहे. आमच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजनेद्वारे, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, या योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा मला विश्वास आहे.

सध्या ही योजना नवीन असल्याने, अजून योजनेच्या चाचणीदरम्यानच आम्ही 1500 रुपयांचा हफ्ता देत आहे. सध्या राज्यातील सर्व पात्र भगिनींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरु ठेवली आहे. राज्यातील पात्र महिलांची ठोस आकडेवारी समोर आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर येणारा आर्थिक भार आणि ईतर गोष्टी विचारात घेऊन सध्याच्या 1500 रुपयांच्या हफ्त्याची रक्कम वाढवली जाईल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना?

मध्य प्रदेशच्या ‘लाडली बहन योजने’पासून प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात ‘माझी लाडकी बहिन’ योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात.

माझी लाडकी बहिन योजनेचा फायदा कोणाला मिळतो?

माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वय असणाऱ्या महिलांना मिळतो, याव्यतिरिक्त, लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • – अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे.
  • – अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.

 विवाहित, अविवाहित, परित्यक्त, घटस्फोटित आणि निराधार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article